सुबोध भावे (Subodh Bhave) आणि गायत्री दातार (Gayatri Datar) या नव्या जोडीची 'तुला पाहते रे' (Tula Pahate re) ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली. आता मात्र ही मालिका प्रेक्षकांना गुड बाय म्हणणार आहे. काही दिवसांपूर्वीच ही मालिका संपणार असल्याचे अभिनेता सुबोध भावे याने सांगितले होते. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही मालिका संपणार असल्याची चर्चा होती. नुकतेच मालिकेतील मायरा अर्थात अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) हिने मालिकेचा प्रवास संपल्याचे सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. ('तुला पाहते रे' मध्ये झेंडेच्या कटकारस्थानाला ईशा पडणार का बळी? काय आहे झेंडें चा नवा प्लान)
मालिकेतील आपल्या सहकलाकारांसह फोटो शेअर करत अभिज्ञा हिने तुला पाहते रे चा प्रवास संपला असे म्हणत संपूर्ण टीमला धन्यवाद दिले आहेत. ('तुला पाहते रे' मालिकेतील ईशाची आई गार्गी फुले - थत्तेबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी !)
अभिज्ञा भावे हिची पोस्ट:
मालिकेत विक्रांत सरंजामे याचा बदला ईशा निमकर कशी घेणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर असून मालिकेचा शेवट नेमका काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.