'तुला पाहते रे' मध्ये झेंडेच्या कटकारस्थानाला ईशा पडणार का बळी? काय आहे झेंडें चा नवा प्लान
Tula Pahate re (Photo Credits: Zee5)

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' (Tula Pahate re) दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. ईशा हीच राजनंदिनी असल्याचे कळताच मालिकेच्या कथानकाने एक वेगळेच वळण घेतले आहे. विक्रांत सरंजामे आणि विलास झेंडे यांचं पितळ उघड पाडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या अघोरी कृत्याची त्यांनी सर्वासमोर कबूल द्यावी यासाठी प्रयत्न करत आहे. विक्रांत ने जरी ईशा बाबतीतल्या सत्यावर विश्वास ठेवला नसला तरी झेंडेंना ईशाच्या सर्व खेळी कळल्या आहेत. आणि त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ते चक्क ईशाला मारण्याचा प्लान करत आहेत. पाहा  Zee5 च्या या लिंकवर 

ईशाने आपल्याला आणि आपण केलेली पापे लोकांसमोर आणू नये म्हणून झेंडेंनी आपल्या हाताशी गुंड बाळगून ईशाला मारण्याचा डाव आखत आहेत. ईशा आईसाहेबां बरोबर अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहे. तेव्हाच योग्य संधी साधून झेंडेचे गुंड ईशाला ठार करणार आहे.

हेही वाचा- 'तुला पाहते रे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? कसा असेल विक्रांत सरंजामेचा शेवट

मात्र ईशाने ज्याप्रमाणे ह्याआधीचे झेंडें चे प्लान धुडकावून लावले तसेच यावेळीही झेंडें चे प्लान ती अयशस्वी करण्यात सफल होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

तुला पाहते रे ही मालिका सध्या अंतिम टप्प्यात आली असल्यामुळे ही मालिका कदाचित प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विक्रांत म्हणजेच सुबोध भावे ची जागा अभिनेता प्रसाद ओक घेणार अशी ही चर्चा ऐकायला मिळत आहे.