'आई कुठे काय करते' (Aai Kuthe kay Karte) या स्टार प्रवाह वरील मालिकेमध्ये 'गौरी' हे पात्र साकारणार्या अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) चा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. एका भरधाव वेगात येणार्या बाईकचा तिच्या स्कुटीला धक्का झाल्याने हा अपघात झाला. सुदैवाने हा अपघात तिच्या जीवावर बेतला नाही. पण गौरीच्या पायाला दुखापत झाली आहे. गौरी कुलकर्णीचा पाय फ्रॅक्चर झाला असून पुढील काही आठवडे तिला डॉक्टरांनी सक्तीचा आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
ईटी टाईम्स सोबत बोलताना गौरीने दिलेल्या माहितीनुसार, समोरून तिला एका स्कूटीचा धक्का लागला. गौरी देखील स्कुटीवर होती. तिची स्कुटी स्लिप झाली आणि ती खाली पडली. यामध्ये पायाला दुखापत झाली आहे. गौरीचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याने तिला सक्तीचा आराम सांगण्यात आला आहे. त्यामुळे गौरी आता पुढील काही दिवस मालिकेत दिसणार नाही. नक्की वाचा: Worli Accident: वरळी मध्ये मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या महिलेला भरधाव गाडीची धडक, महिलेचा जागीच मृत्यू; चालक अटकेत.
दरम्यान गौरीच्या चाहत्यांनी हे वृत्त समजताच काळजी व्यक्त केली आहे. तसेच ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. मालिकेमध्ये गौरी आणि अभिषेक ही एक खास जोडी आहे. मालिकेत 'लॉंग डिस्टंस रिलेशनशीप' वरून त्यांच्यामध्ये तणाव दाखवला आहे. ही खास जोडी इतर पात्रांप्रमाणेच रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.