Zee Marathi Awards 2019 चं सूत्रसंचालन करणार 'हे' 9 प्रसिद्ध कलाकार (See Photos)
Zee Marathi Awards 2019 (Photo Credits: File Image)

दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार सोहळ्याची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे प्रश्न सर्वानाच भेडसावत असतात. याहीवर्षी ही चुरशीची स्पर्धा रंगली आहे 'माझ्या नवऱ्याची बायको', 'मिसेस मुख्यमंत्री', 'अगंबाई सासूबाई', ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकांमध्ये.

Zee Marathi Awards (Photo Credits: File Image)
Zee Marathi Awards (Photo Credits: File Image)

झी मराठीवरील मालिकांमधील प्रमुख भूमिका निभावणारे नायक नायिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या झी मराठी अवॉर्ड्सच्या निमित्ताने हे सर्व कलाकार दिसणार आहेत एकत्र एकाच मंचावर.

Zee Marathi Awards (Photo Credits: File Image)

या कार्यक्रमाला खरी रंगत येते ती म्हणजे हलक्याफुलक्या आणि रंजक सूत्रसंचालनाने. यावेळी झी मराठी अवॉर्ड्सचं सूत्रसंचालन एक-दोन नाही तर चक्क 9 कलाकार करणार आहेत. रात्रीस खेळ चाले 2 मालिकेतील पांडू-अण्णा-शेवंता, माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील गुरुनाथ-राधिका-शनाया, अग्गबाई सासूबाई मधील अभिजित राजे-आसावरी आणि मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी हे सर्व मंचावर सूत्रसंचालनासाठी सज्ज होणार आहेत.

Zee Marathi Awards (Photo Credits: File Image)

प्रेक्षकांचे अडवते झी मराठीचे सर्व कलाकार त्यांच्या हटके स्टाईलने मंचावर येऊन सूत्रसंचालन करतील तेव्हा कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढेल यात शंकाच नाही. यंदाचा झी मराठी अवॉर्ड्स सोहळा रविवार 20 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होणार आहे.