अभिनेत्री नुसरत जहां हिच्या पतीला 45 हजारांचा गंडा
नुसरत जहां आणि निखील जैन (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)  हिने नुकतेच उद्योगपती निखील जैन (Nikhil Jain) याच्यासोबत लग्न केले. मात्र व्हीआयपी क्रमांक (VIP Number) हवा यासाठी प्रयत्न करत असलेल्या निखील जैन याची फसवणुक झाली असून त्याला चक्क 45 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

निखील जैन यांच्या मोबाईलवर व्हीआयपी क्रमांकाबद्दल एक मेसेज आला होता. त्यावर तुम्हाला व्हीआयपी क्रमांक हवा असल्यास त्यासाठी 45 हजार रुपये जमा करावे असे सांगण्यात आले होते. त्यानुसार निखील याने तेवढे पैसे संबंधित खात्यात जमा केले. मात्र कोलकाता येथील काही उद्योगपतींनीसुद्धा असाच प्रकार केल्यावर त्यांची फसवणूक झाल्याची बाब समोर आली. तेव्हा निखील पासून अन्य उद्योगपतींनी याबद्दल पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तर दिल्ली सायबर सेलकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.(रिसेप्शनपूर्वी नुसरत जहां ने शेअर केलेले खास फोटोज सोशल मीडियात हिट Photos)

नुसरत जहां हिने निखील याच्यासोबत हिंदू पद्धतीने आपला विवाहसोहळा पार पाडला. तर दोघांच्या रिसेप्शन पार्टीचे फोटोसुद्धा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत. तसेच संसदेत शपथविधी सोहळ्यातील नुसरतचा लूक चर्चेचा विषय ठरला होता. नुकतेच लग्न झाल्याने नववधू प्रमाणे ती नटून ती आली होती. हातावर मेहंदी, संदूर, साडी, चुडा या तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.