Siddharth Jadhav's Tweet: '2020 चा हा संकटकाळ अधिक कठीण होतोय' मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याची ट्विटरवर भावनिक पोस्ट
Sidharth Jadhav (Photo Credit: Facebook)

मुंबई (Mumbai Rains) व उपनगरात मंगळवार संध्याकाळपासूनच जोर धरल्यामुळे पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले होते. तर, बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. या पावसाची गणना अतिवृष्टीमध्ये केली गेली असून मुंबईत तब्बल 286.4 मिमि पावसाची नोंद झाली आहे. मात्र, आता पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, सतत दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे मुंबईतील दामोदर नाट्यगृहामध्येदेखील (Damodar Natyagriha) पाणी शिरले होते. मुसळधार पावसामुळे नाट्यगृहाची झालेली अशी परिस्थिती पाहून मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) भावूक झाला आहे. सिद्धार्थने ट्विटरच्या माध्यमातून या नाट्यगृहाचे काही फोटो शेअर केले आहे. सोबतच त्याने भावनिक पोस्टही लिहली आहे. त्याच्या या ट्विटला अनेक कलाकारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“शाळेच्या गॅदरिंगपासून ज्या स्टेजवर उभं रहायला शिकलो. जेथ नाटकं पाहिली, भरलेल्या प्रेक्षकांच्या साथीने प्रयोग केले. त्या नाट्यगृहाचे असे फोटो पाहून ढसाढसा रडावसं वाटतंय, भरुन आलंय.. 2020 चा हा संकटकाळ अधिक कठीण होतोय ते पाहावत नाही. प्रार्थना…काळजी घ्या”, अशा आशयाची पोस्ट सिद्धार्थने ट्विटरवर शेअर केली आहे. हे देखील वाचा- Guns of North: 'मुळशी पॅटर्न' चा हिंदी रिमेक 'गन्स ऑफ नॉर्थ' चं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार? सलमान खान निर्माता

सिद्धार्थ जाधवचे ट्विट-

सिद्धार्थने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोत दामोदर नाट्यगृहाची आसनेदेखील पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. नाट्यगृह हे कलाकारांसाठी अतिशय मोलाचे स्थान आहे. मोठमोठे कलाकार नाट्यगृहातूनच पुढे आल्याचे अनेकांनी सांगितले आहे. मात्र, नाट्यगृहाची सध्याची परिस्थिती पाहता अनेक जेष्ठ कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.