Photo Credit -X

The Buckingham Murders OTT Release: बकिंघम मर्डर्स अखेर (The Buckingham Murders) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 13 सप्टेंबर पासून सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजला चाहत्यांकडून नाराजी आहे. कारण चित्रपट हिंदीत प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट इंग्रजी सबटायटल्ससह फक्त हिंदी डबिंगमध्ये (Hindi Dubbing) उपलब्ध असल्याने प्रेक्षकांची निराशा झाली आहे. करीना कपूर (Kareena Kapoor)खानचा क्राइम थ्रिलर त्याच्या मूळ भाषेत पाहण्यास उत्सुक असलेल्या चाहत्यांची त्यामुळे निराशा झाली आहे. (Childhood Memories Revived: अनुष्का शर्मा-विराट कोहलीसोबत डोसा डेट; फोटो व्हायरल)

हिंदी डबींगबद्दल प्रेक्षकांमध्ये नाराजी

प्रेक्षकांनी त्यांची मते मांडताना म्हटले की, 'बकिंगहॅम मर्डर्स हिंदीत का डब केले गेले आहे? ते पाहणे खूप त्रासदायक आहे. इंग्रजी आवृत्ती आहे, परंतु नेटफ्लिक्स तो पर्याय देत नाही.' दुसऱ्या वापरकर्त्याने, व्ह्यूइंग ऑप्शनचे स्टिल शेअर करत, नेटफ्लिक्सला पर्यायी व्ह्यूइंग पर्याय उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

करीना कपूर खानचा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ नेटफ्लिक्सवर रिलीज

'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटाबद्दल

या चित्रपटात करीना कपूर खानने जसमीत “जाझ” भामरा या ब्रिटीश-भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. जिच्यावर बकिंगहॅमशायरमधील एका मुलाच्या हत्येचा तपास सोपवण्यात आला आहे. हंसल मेहता दिग्दर्शित, क्राईम थ्रिलरमध्ये रणवीर ब्रार आणि सारा-जेन डायस देखील प्रमुख भूमिकेत आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये 67 व्या BFI लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये बकिंगहॅम मर्डर्सचा प्रीमियर झाला.