मुंबईत आरे कॉलनी परिसरात मुंबई मेट्रो 3 चं कारशेड उभारण्यासाठी सुमारे 2700 झाडांची कत्तल करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. शुक्रवार, 4 ऑक्टोबर रात्रीपासून आरे परिसरात तणावाच्या बनलेल्या परिस्थितीवर सामान्य पर्यावरण प्रेमींपासून सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया अनेकांनी यामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. सध्या नवरात्रीदरम्यान नवदुर्गेच्या विविध रूपात वर्तमान स्थितीवर भाष्य करणार्या तेजस्वीनी पंडितनेदेखील 'गावदेवी'चं रूप धारण केलं आहे. मुंबई मेट्रोसाठी होणारी झाडांची कत्तल यावर तिने बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. 'गावदेवी'च्या रूपातील तेजस्विनीने झाडाला मीठी मारत आरेतील वृक्षतोडीवर निषेध व्यक्त केला आहे. Navratri 2019: अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने कामाख्या देवीच्या अवतारात बलात्काराच्या घटनांवर केले भाष्य (See Photos)
आज (6 ऑक्टोबर) दिवशी मुंबईत आरे परिसरात आंदोलकांचा विरोध कायम आहे. काल सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी कलम144 लागू करत संचारबंदी लागू केली आहे. जमावबंदी सोबतच आरे कॉलनी परिसरात वाहनांना देखील बंदी आहे. मुंबई पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेतले असून 38 जणांना अटक केली आहे.
तेजस्विनी पंडित
तेजस्वीनी पंडित यंदा नवरात्र एका अनोख्या अंदाजात साजरी करत आहे. देवीच्या विविध स्वरूपात खास फोटोशूट करत तिने समाजात भेडसावणार्या विविध समस्यांवर भाष्य केलं आहे. यामध्ये आर्थिक मंदी, महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती, मुंबईतील ध्वनी प्रदुषण याचा यामद्ये समावेश आहे. या फोटोशूट दरम्यान तेजस्विनीवर करण्यात आलेल्या मेकअपची, खास वेशभूषेची विशेष चर्चा आणि कौतुक आहे.
यंदा नवरात्र 29 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत साजरी केली जाणार आहे. नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या या सणामध्ये विजयादशमी, दसरा या सणाने सांगता केली जाते. यंदा दसरा 8 ऑक्टोबर दिवशी आहे.