सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) मुख्य आरोपी म्हणून चौकशीला सामोरी जाणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ने (Rhea Chakraborty) काल, सुशांतची बहीण प्रियंका सिंह (Priyanka Singh) आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार व इतरांवर बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन (Bogus Medical Prescription) बनविल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानुसार ही तक्रार पुढे सीबीआय (CBI) कडे सोपावण्यात येणार आहे. सुशांतला त्याची बहीण प्रियंका सिंहने, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमारकडून घेतलेले बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन पाठवले होते. त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधांचा उल्लेख होता अशी माहिती देत रियाने वांद्रे पोलिसांंना दिली होती.
प्राप्त माहितीनुसार, वांद्रे पोलिसांंनी प्रियंका आणि डॉ. तरुण यांंच्यावर एनडीपीएस कायदा आणि टेली मेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वे 2020 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मनेशिंद यांच्या माहितीनुसार, 8 जून, 2020 रोजी सुशांतला Out Patient Department दाखवून, औषधे लिहून दिली होती. ही औषधे सायकोट्रॉपिक पदार्थांमध्ये येतात आणि आणि टेली मेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही औषधे प्रतिबंधित आहेत.
ANI ट्विट
As per the complaint of #RheaChakraborty, a case has been registered at Bandra Police Station in Mumbai. However, in line with the orders of the Supreme Court, the case is duly transferred to CBI (Central Bureau of Investigation) for further investigation: PRO, Mumbai Police https://t.co/84gTcq9iTe
— ANI (@ANI) September 8, 2020
दरम्यान, सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सीबीआय, ईडी आणि एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहेत.आज सुद्धा रियाची सलग तिसर्या दिवशी मुंंबईतील NCB कार्यालयात दाखल झाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांत सिंगचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यासह अनेकांना अटक केली आहे.