
टेलिव्हिजन स्टार आणि मॉडेल सोफिया हयात (Sofiya Hayat) ही तिच्या सोशल मीडियावरील फोटो आणि पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. तर नुकतान तिने एक न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून नेटकऱ्यांकडून तिच्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
सोफिया हिने इन्स्टाग्रामवर न्यूड फोटो पोस्ट केला आहे. परंतु काही नेटकऱ्यांनी तिच्याविरुद्ध संताप व्यक्त करत भारतात बलात्काराच्या प्रकाराला प्रोत्साहन देत असल्याचे म्हटले आहे. तसेच तुमच्या सारख्या महिलांविरुद्ध कारवाई केल्यास बलात्कार करण्याची प्रकरणे तरी थांबतील असे म्हणत एका नेटकऱ्याने आपला संताप व्यक्त केला आहे. अशा पद्धतीची प्रतिक्रिया पाहून सोफियाला धक्का बसला असून तिने त्या नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेचा फोटो स्क्रिनशॉट काढून असे लिहिले आहे की, मी फोटोवर येणाऱ्या सर्व प्रतिक्रिया वाचत नाही. परंतु एका मीडिया हाऊसने हे प्रिंट केले असून माझ्या फोटोवर अशा पद्धतीचे लिहिलेले पाहून मी हैराण झाले असल्याचे सोफिया हिने म्हटले आहे.(हेही वाचा-'उर्वशी रौतेला'ने इंस्टाग्रामवर शेअर केला 'बॉडीसूट'मधील फोटो)

नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर उत्तर देत सोफियाने म्हटले की, देशात अजूनही अशा पद्धतीची विचारसरणी असणारी लोक आहेत. काय हे खरे आहे का? परंतु भारतातील लोक अशा विचारसरणीची नसल्याचेसुद्धा सोफिया हिने म्हटले आहे.