'उर्वशी रौतेला'ने इंस्टाग्रामवर शेअर केला 'बॉडीसूट'मधील फोटो
Urvashi Rautela (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) नुकताच इंस्टाग्रामवर एक 'हॉट' अंदाजामधील फोटो शेअर केला आहे. बाथरूममध्ये शॉवरखाली उभी असलेली उर्वशी पीच रंगाच्या लेसी बॉडीसूटमध्ये आहे. या फोटोमधील उर्वशीची टोन बॉडी अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. उर्वशी रौतेलाचे हॉट अंदाजातील नवे फोटोज सोशल मीडियामध्ये व्हायरल!

उर्वशी रौतेला इंस्टाग्राम  फोटो

 

View this post on Instagram

 

🚿 #MAXIM

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳Actor (@urvashirautela) on

उर्वशी काही दिवसांपूर्वी हेट स्टोरी 4 या बॉलिवूडपटामधून रसिकांच्या भेटीला आली होती. या सिनेमामध्ये उर्वशीसोबत करण वाही, विवान भटेना देखील झळकला होता. उर्वशी काही दिवसांपूर्वी 'बोनी कपूर यांनी तिला चूकीचा स्पर्श केल्याच्या कारणावरून चर्चेमध्ये आली होती. त्याबबतचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. मात्र सारे मीडीया रिपोर्ट्स चूकीचे असल्याचं सांगत तिने श्रीदेवीचे पती बोनी कपूर 'जेंटलमॅन' असल्याचं म्हटलं आहे.

उर्वशी मिस दिवा 2015 आहे. भारताचं प्रतिनिधित्व उर्वशीने मिस युनिव्हर्ससाठीदेखील केलं होतं. ही सौंदर्यवती पुढे काही सिनेमांमधून रसिकांच्या भेटीला आली. मात्र 'हॉट' अदांसाठीच तिचं नावं अधिक चर्चेमध्ये राहिलं आहे.