नुकताच भारत पाकिस्तान वर्ल्डकप सामना पार पडला. भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत परत एकदा आपण बाप असल्याचे सिद्ध केले. या पार्श्वभूमीवर भारताची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. ‘एकेकाळी शोएब सोनालीचा इतका मोठा चाहता होता की तो तिचे फोटो पाकिटात घेऊन फिरायचा किंवा शोएबला सोनालीचे अपहरण करायचे आहे’ अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. आता याबाबत पहिल्यांदाच शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे. शोएब अख्तरने एक व्हिडिओ पोस्ट करून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत शोएब म्हणतो, ‘सोनाली बेंद्रेला मी फार कमी चित्रपटांमध्ये पहिले आहे. मात्र मी आजपर्यंत सोनालीला कधीच भेटलो नाही. मी तिचा कधीच चाहता नव्हतो. तिला एक दोन चित्रपटांमध्ये पाहण्यापलीकडे माझा आणि तिचा काहीही संबंध नाही. ती इतक्या मोठ्या आजारातून ज्या प्रकारे बाहेर आली, या काळात तिने जी हिम्मत दाखवली ते पाहून आता मी तिचा चाहता झालो आहे. माझ्या खोलीत सोनालीचा नाही तर फक्त इम्रान खान यांचाच फोटो असतो. त्यामुळे सोनाली आणि माझ्या अफेअरच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत.' (हेही वाचा: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला आवडायची सोनाली बेंद्रे, पाकिटात फोटो घेऊन फिरायचा)
तर आता स्वतः शोएब अख्तरने याबाबत प्रतिक्रिया देऊन सोनाली आणि त्याच्या अफेअरवर संपूर्णपणे पडदा टाकला आहे. या व्हिडिओमध्ये शोएबने सानिया मिर्झा आणि भारत पाकिस्तान सामन्यानंतर ज्या प्रकारे पाकिस्तानी टीमला ट्रोल केले गेले त्याबाबतही आपली मते व्यक्त केली आहेत.