
Riteish Deshmukh in ‘Raid 2’: 'रेड 2' च्या निर्मात्यांनी रितेश देशमुखचा चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित केला आहे. पोस्टरमध्ये, रितेश देशमुख राजकारण्याच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटातील स्व:ताचा फर्स्ट लूक शेअर करताना रितेशने लिहिले की, "कानून का मोहताज नहीं, कानुन का मलिक है दादा भाई! #रेड२ 1 मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये दाखल होत आहे."
पोस्टरमध्ये, रितेश गर्दी असल्याचे दिसत आहे. हात वर करून हाताची मूठ बांधलेला आहे. तो राजकारण्याच्या भूमीकेत असल्याचे दिसत आहे. आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर दाखवण्यात आला आहे.
‘रेड 2’ चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक
View this post on Instagram
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित, रेड 2 मध्ये वाणी कपूर देखील आहे. 2018 च्या हिट 'रेड' चित्रपटाचा सिक्वेल असलेला हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. आयआरएस अधिकारी अमय पटनायक यांचा प्रवास सांगणापा हा चित्रपट आहे. मूळ चित्रपटाप्रमाणेच, हा सिक्वेल वास्तविक जीवनातील प्रेरणा दाखवतो. ज्यामध्ये आयकर विभागाचे अधिकारी, गुप्तचर संस्थांच्या सहकार्याने व्हाईट कॉलर गुन्हेगारी कारवायांचा तपास कसा करतात आणि त्यांचा पर्दाफाश कसा करतात हे दाखवले आहे.
रेडमध्ये देवगण यांने आयआरएस अधिकारी अमय पटनायक यांची भूमिका साकारली. चित्रपटात इलियाना डिक्रूझ आणि सौरभ शुक्ला यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. रेड २ ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज यांनी सादर केला आहे आणि पॅनोरमा स्टुडिओजची निर्मिती आहे. हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.