Rakhi Sawant (Photo Credits: Facebook)

देशभरात सीएए (CAA) आणि एनआरसीचा (NRC) मुद्दा देशभरात उचलून धरला जात आहे. देशातील बहुतांश ठिकाणी या मुद्द्याचा विरोध केला जात असून आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी एनसीआरला विरोध करणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे ही दिसून आले आहे. याच पार्श्वभुमीवर बॉलिवूडमधील ड्रामा गर्ल राखी सावंत (Rakhi Sawant) हिने एनआरसी मुद्द्यावरुन तिच्या चाहत्यांना एक सल्ला दिला आहे. सोशल मीडियात नेहमीच राखी सावंत तिच्या वादग्रस्त विधानांवरुन चर्चेत राहते तर आता सुद्धा तिने एनआरसी मुद्द्यावरुन केलेल्या विधानामुळे चर्चा सुरु झाली आहे.

राखी सावंत हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत असे म्हटले आहे की, देशातील नागरिकांना त्यांचे नागरिकत्व वाचवण्यासाठी एक अत्यंत खास आयडिया आहे. यासाठी नागरिकांनी मोठे कर्ज घ्यावे, त्यावेळी बँक तुम्हाला तुमचे नागरिकत्व खरं शोधून काढण्यासाठी पुरावे शोधून काढेल. राखीचा हा सल्ला तिच्या चाहत्यांना पटण्यासारखाच आहे असे म्हणावे लागेल. कारण तिने केलेल्या अशा विधानांची नेहमीच सोशल मीडियात खिल्ली उडवली जाते. पण आता एनआरसीवरुन केलेले हे विधान सुद्धा तिची खिल्ली उडवत आहे.(राखी सावंत ने बाथटब मध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ शेअर करत फॅन्सना दिली 'ही' खुशखबर)

 

View this post on Instagram

 

Jaao lone lelo daro Matt NRC se🤪

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

सोशल मीडियात नव्या वर्षासाठी राखी हिने तिचा लूक बदलला आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरुन तिच्या चाहत्यांचे टिकटॉक व्हिडिओ पोस्ट करत आहे. तर दोन-तीन दिवसांपूर्वी राखी सावंत हिचा बाथटब मधील व्हिडिओ व्हायरल झाला होता.