राखी सावंत ने बाथटब मध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ शेअर करत फॅन्सना दिली 'ही' खुशखबर
Rakhi Sawant (Photo Credits: Instagram)

आपल्या हटके अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या राखी सावंत (Rakhi Sawant)  हिने यावेळेस अंघोळ करतानाचा बाथटब मधील व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. जर का तुम्ही राखी सावंतचे फॅन असाल तर  तुमच्यासाठी एक खुशखबर सुद्धा तिने या व्हिडीओ मध्ये दिली आहे. वास्तविक आपल्या कथित लग्नानंतर राखी सावंत लंडन (London) ला राहायला गेल्याचे अनेकदा सांगते, या व्हिडिओत तिने तसा उल्लेख केला आहे. लंडन ला आपल्याला काहीच समस्या नाहीये, इतकंच नव्हे तर इथली राणी सुद्धा आपली फॅन आहे असाही बडेजाव तिने केला आहे, पण इतकं सगळं असूनही आपलं इथे मन लागत नाहीये आणि सतत आईकडे, मुंबई कडे ,बॉलिवूड इंडस्ट्रीकडे, फॅन्सकडे येण्याची इच्छा होतेय असे सांगताना राखी भावुक झालेली पाहायला मिळते, यावरून लवकरच ती बॉलीवूड मध्ये पुन्हा आगमन करणार असल्याचा इशारा सुद्धा तिने दिला आहे. Rakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video

राखी सावंत नेहमीच आपल्या व्हिडीओ मध्ये वेगवेगळे अवतार घेत असते, कधी लहान मुलांसारखा दिसणारा फिल्टर वापरून तर कधी भडक मेकअप करून ती सर्वांचे लक्ष वेधून घेते, आणि त्यात तिच्या गप्पा तर आणखीनच भारी असतात. याही व्हिडिओत ती गुलाबी विग आणि लिपस्टिक मध्ये दिसत आहे. बॉलिवूड मधील मंडळी, मग अगदी शाहरुख खान, अक्षय कुमार पासून ते कारण जोहर, विद्या बालन पर्यंत सर्व जण आपल्याला रोज कॉल करून भारतात बोलवत असतात आणि म्ह्णूनच आपण पुन्हा बॉलिवूड मध्ये परतण्याचा विचार करत आहोत असे राखीने या व्हिडिओत म्हंटले आहे.

पहा काय म्हणतेय राखी सावंत

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

दरम्यान, राखीच्या या व्हिडीओवर तिच्या फॅन्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत, प्रत्येक व्हिडिओप्रमाणे हा व्हिडीओ सुद्धा काहीच वेळात जोरदार व्हायरल झाला होता.