Rakhi Sawant चा बोल्ड सीन होत आहे व्हायरल; पहा हा Video
Rakhi Sawant (Photo Credits-Instagram)

Rakhi Sawant Intimate Scene Video: राखी सावंत ही बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या बोल्ड फोटो किंवा व्हिडिओंमुळे चर्चेत असते. याही वेळी तिने एक असा व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका पुरुषासोबत इंटिमेट होताना दिसत आहे.

राखी सावंतचा हा व्हिडिओ एखाद्या चित्रपटाचा किंवा म्युझिक व्हिडिओचा भाग असल्याचे बोलले जात आहे. राखीने हा व्हिडिओ जरी शेअर केला असला तरी त्याबद्दल काही तपशील मात्र शेअर केलेला नाही. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत नेमका कोण अभिनेता आहे हे राखीने अद्याप सांगितलेले नाही. मात्र व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने त्या अभिनेत्याविषयी लिहिताना 'ठंडा' असे म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये राखीने रेड कलरचा ड्रेस परिधान केला असून ती एक वाळवंटात रोमांस करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती अनेक बोल्ड सीनसुद्धा देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की राखीने लग्नानंतरचा ब्रेक संपवला असून अखेर काम करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. अलीकडेच तिने झी टीव्हीवर येणार्‍या सीरियलची क्लिपही शेअर केली आहे, ज्यामध्ये ती डायन च्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय तिने बँकॉकमधील आपल्या स्टेज शोचा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर फॅन्ससोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये 'आँख मारे' गाण्यावर ती नाचताना दिसत आहे.

अबब! Rakhi Sawant आहे कोट्याधीश; तिची एकूण संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान, राखी सावंतने गेल्या वर्षी जुलैमध्ये यूकेमध्ये राहत असलेल्या रितेश नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते. राखी सावंतने सांगितले की तिचा नवरा एक व्यावसायिक आहे. परंतु, रितेशने काही वेबसाईट्सना त्याची मुलखात दिली असली तरीही स्वतःची ओळख मात्र कधीच उघड केली नाही. तसेच, राखीने देखील असे म्हटले आहे की, योग्य वेळ येईल तेव्हा ती सर्व रहस्यांचा उलगडा करेल.