अबब! Rakhi Sawant आहे कोट्याधीश; तिची एकूण संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Rakhi Sawant (Photo Credits-Instagram)

बॉलीवूडची ड्रम क्वीन म्हणजेच राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते, मग ते तिच्या सेंसेशल सोशल मीडिया पोस्टमुळे असो किंवा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे.

पण सध्या मात्र ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत दिसत आहे, ते म्हणजे तिच्या मालकीची एकूण संपत्ती. राखीने इतक्यात कोणतीही जाहिरात अथवा सिनेमा केला नसून देखील तिच्याकडे असलेल्या संपत्तीचा एकूण आकडा नक्कीच तुम्हाला थक्क करेल.

तब्बल 15 कोटींच्या संपत्तीची राखी मालकिण आहे. राखीचे वडील आनंद सावंत हे मुंबई पोलिस विभागात कॉन्स्टेबल होते तर आई जयासोबत ती मुंबईत वास्तव्याला आहे.

राखीची एकूण संपत्ती

अनेक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राखी 15 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. तिच्याजवळ मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला. तिच्या बंगल्याची एकुण किंमत 11 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याजवळ 21.6 लाख रुपयांची फोर्ड एंडेवर कार आहे. ती ही सर्व कमाई स्टेज परफॉर्मेसमधून येते.

Rakhi Sawant हिच्या नवऱ्याची पहिली मुलाखत; पहा काय म्हणाला राखीच्या बोल्ड सीन देण्याबद्दल

राखी आणि तनुश्री दत्ता यांचे एकमेकांविरुद्ध खटले

अभिनेत्री तनुश्री दत्ताने हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यावरुन राखीने तनुश्रीविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. म्हणूनच तनुश्री दत्ताने राखीवर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. त्याचे प्रत्युत्तर म्हणून राखीने तनुश्रीला 50 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची धमकी दिली होती.