Watch Video: करवा चौथच्या रात्री Rakhi Sawant ला आवरले नाही रडू, कारण...
Rakhi Sawant (Photo Credits: Instagram)

कालपासून बॉलीवूड तसेच टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींचे करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. त्यात विराट आणि अनुष्का शर्माच्या फोटोला फॅन्सनी प्रचंड पसंती दर्शवली. आणखी एक सोशल मीडियावर चर्चेत असलेली व्यक्ती म्हणजे राखी सावंत.

करवा चौथसाठी राखीचा गाजर हलवा बनवतानाचा व्हिडिओ वायरल तर झालाच पण त्याहूनही जास्त राखीला नेटकरी मंडळींकडून ट्रोल करण्यात आलं. तो व्हिडिओ चर्चेत असतानाच राखीने अजून काही व्हिडिओ करवा चौथ साजरा करताना शेअर केले आहेत आणि त्यातीलच एका व्हिडिओत ती रडताना दिसली.

पण तिच्या रडण्याला फसू नका कारण हा फक्त राखीने केलेला ड्रामा आहे. या व्हिडिओवरही राखीला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

इतर व्हिडिओंमधून राखीने तिच्या फॉलोवर्सने सांगत होती की, "माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना करवा चौथच्या शुभेच्छा…माझ्या आयुष्यातील ही पहिली करवा चौथ आहे आणि मी दिवसभर माझ्या पतीसाठी उपवास केला होता. माझे पती खूप चांगले आहेत. माझ्या आयुष्यात मी प्रचंड आनंदी आहे आणि माझे पती तर ‘नंबर वन’ आहेत कारण माझी निवड कधीच चुकणार नाही. माझे पती मला देवाने दिलेली भेट आहे."

Rakhi Sawant पुन्हा झाली ट्रॉल; गाजर हलवा बनवतानाचा व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले (See Video)

राखीच्या पतीने देखील स्पॉटबॉय-इ या वेबसाईटले दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की राखीच्या रूपात देवाने त्याला एक भेट दिली आहे.

कालच्या करवा चौथच्या फोटोंमध्ये राखी नटून थटून तयार झालेली दिसून येते. बनारसी साडी, हातात चुडा, सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र अशा पेहेरावात ती सजली आहे.