
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कायमच तिच्या अतरंगी व्हिडिओस किंवा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. राखीने नेहमी प्रमाणेच चर्चेत राहायला अजून एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण दरवेळेस सारखी याही वेळी ती लोकांकडून ट्रोल झाली आहे.
राखीने या व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार तिने 'करावा चौथ'चा व्रत ठेवला होता. तसेच ती सध्या यूकेमध्ये (United Kingdom) असल्याचे तिने सांगितले आहे व ती गाजर हलवा बनवत आहे.
पण निरखून बघितल्यास तुम्हालाही दिसेल कि तिच्या घरातील किचन हे भारतीय असल्याचे दिसून येते. तसेच घरातील भांडी, गॅस स्टोव्ह सगळंच आपल्या देशातील असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हे सर्व बघून नेटकऱ्यांनी राखीला खूपच ट्रोल केलेलं कॉममेंट्समधून स्पष्ट दिसत आहे.
अबब! Rakhi Sawant आहे कोट्याधीश; तिची एकूण संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
राखीने अलीकडेच तिचे एका NRI सोबत लग्न झाले असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते. तिने लग्नातील लुकमधील फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु ते खोटं असल्याचे अनेकांचे मत होते. परंतु अलीकडेच तिच्या नवऱ्याने स्पॉटबॉय- इ या न्यूस वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीतून राखीचं खरंच लग्न झालं असल्याचं मानला जात आहे.