गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि त्याची पत्नी दिशा परमार (Disha Parmar) या दोघांनाही डेंगीची (Dengue) लागण झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिली आहे. गणपतीच्या दिवसांमध्येच दोघेही आजारी पडल्याची माहिती आणि हेल्थ अपडेट्स इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत दिली आहे. नक्की वाचा: BMC 'Bhag Machchar Bhag' Campaign: 'भाग मच्छर भाग'; डेंग्यू आजाराचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेची अनोखी मोहीम.
दरम्यान राहुलने त्याला 104 डिग्री ताप असल्याची माहिती दिली होती तसेच सोशल मीडीयावरही कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याचे फोटो शेअर केले होते. नक्की वाचा: Dengue Chikungunya Cases Increase in Mumbai: साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ; डेंग्यूचे 1013 रुग्ण, चिकनगुन्याचे 164 रुग्ण, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ .
मुंबई मध्ये पावसाळ्याच्या दिवसात आता डेंगी, मलेरिया, चिकनगुनियाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान बीएमसीने देखिल वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाला केले आहे. डेंग्यू हा एडिस डासांमुळे होतात. अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून एडिस डासांची उत्पत्ती होते.