Ragini MMS Returns Season 2 चा ट्रेलर प्रदर्शित; दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद सनी लिओनी साकारकरणार प्रमुख भूमिका
Ragini MMS Returns Season 2 (Photo Credits: YouTube)

रागिनी फॅन्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रागिनी एमएमएस रिटर्न्स या वेब सिरीजच्या प्रचंड यासानंतर अखेर निर्मात्यांनी शेवटी बहुप्रतिक्षित असा रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 (Ragini MMS Returns Season 2) हा नवा सीझन प्रेक्षकांसाठी आणायचं ठरवलं आहे. प्रेक्षकांना या नव्या सीझनची एक खास झलक एका ट्रेलरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. नुकताच सीझन 2 चा सस्पेन्स थ्रिल्लर आणि रोमान्सने भरलेला हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

रागिनी एमएमएस रिटर्न्स सीझन 2 मध्ये रिअल-लाइफ कपल दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांच्यासह सुपर हॉट सनी लिओनी सुद्धा पाहायला मिळणार आहे.

सनी या सिरीजमध्ये एका भूतप्रेत एक्सपर्टची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रेक्षकांना या सर्वाचा खराखुरा अनुभव देण्यासाठी निर्मात्यांनी 10 मिनिटांची एक व्हीआर क्लिप देखील तयार केली आहे. ही वेब सीरीज 18 डिसेंबर रोजी ऑल्ट बालाजी आणि झी 5 वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या ट्रेलरमध्ये दिव्या अग्रवालने साकारलेल्या रागिनी श्रॉफ या फायनल इयर विद्यार्थिनीच्या आयुष्याची झलक पाहायला मिळते. रागिनीच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीचं लग्न ठरलं असतं, त्यामुळे तिची बॅचलरॅट पार्टी साजरा करण्यासाठी सर्व मैत्रिणी ऑल गर्ल्स ट्रिपवर जातात. पण या मुलींचा पाठलाग करत, त्यांच्याच कॉलेजमधील मुलांचा एक ग्रुप सुद्धा तिकडे पोहोचतो. जंगलात एका नव्याने सुरु झालेल्या हॉटेलमध्ये हे सर्वजण पोहोचतात. परंतु, या हॉटेलमध्ये पोहोचल्यावर सुरु होते खरा ड्रामा जेव्हा रागिनीला तिथे काही विचित्र गोष्टी घडत असल्याचे भास होऊ लागतात.

Naagin 4 च्या पहिल्या प्रोमो मध्ये पाहा नव्या सीझन ची छोटी झलक (Video Inside)

या सर्वात खरी रंगात आणली आहे सनी लिओनीच्या  'हॅलो जी!' या गाण्याने. संगीत-दिग्दर्शक जोडी मीत ब्रोस यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे तर विष्णू देवाने या गाण्याची कोरिओग्राफ केली आहे. हे गाणे बेबी डॉल गायिका कनिका कपूर हिने गायले आहे.