#PriyankaNick Wedding : आजपासून प्रियांका-निक यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम आणि विधी होणार
Picture Credits: Priyanka Chopra's Instagram Account)

देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priynaka Chopra) आणि अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) यांचा काही महिन्यांपूर्वीच साखरपूडा झाला. मात्र आजपासून या दोघांच्या लग्नसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम आणि विधी मुंबईत सुरु होणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actor) प्रियांका चोप्रा आणि निक जोनास लवकरच लग्न करणार आहेत. तर आज प्रियांकाच्या मुंबई येथील घरी गणेश पूजन करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र 29 नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत असे कार्यक्रम होणार आहेत. तर 30 नोव्हेंबरला हळदीचा समारंभ ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा - प्रियांका चोप्रा - निक जोनासच्या लग्नाची तारीख ठरली ! जोधपूरला पार पडणार शाही सोहळा)

येत्या 2 डिसेंबरला प्रियांका आणि निक भारतीय पद्धतीनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. जोधपूरच्या ‘उमेद भवन पॅलेस’चं नाव चर्चेत आहे. प्रियांका आणि निक जोनासचा विवाहसोहळा पारंपारिक आणि तितकाच राजेशाही थाटात पार पडणार आहे.