
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना डॉक्टरांनी किमान 7 दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे मुंबई होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. प्रशांत दामले यांनी फेसबुकच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, आयसोलेशनमध्ये असल्यामुळे बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहात होणारे प्रयोग रद्द करावे लागणार आहेत. तसेच प्रशांत दामले यांच्यासह काम करणारे सह-कलाकार निरोगी, असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
लॉकडाउननंतर पहिल्यांदाच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग 12 डिसेंबरला पुण्यात झाला होता. पुण्याहून मुंबईत परतल्यानंतर त्यांना थोडीशी कणकण जाणवू लागली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. तसेच डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांचे आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. हे देखील वाचा- PCR Test Rate: महाराष्ट्रात कोरोना विषाणू चाचणी 980 रुपयांऐवजी 700 रुपयांमध्ये होणार; दरामध्ये सहाव्यांदा कपात
प्रशांत दामले यांची फेसबूक पोस्ट-
प्रशांत दामले आयसोलेशनमध्ये असल्यामुळे बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहात होणारे प्रयोग रद्द करावे लागले आहेत. प्रशांत दामले यांच्यासोबत काम करणारे सह-कलाकार निरोगी असल्याचेही माहिती समोर येत आहे.