मुंबईच्या V Unbeatable डान्स ग्रुप ने जिंकले America's Got Talent Season 2 चे विजेतेपद (Watch Video)
V Unbeatble Dance Group Wins America's Got Talent Season 2 (Photo Credits: Instagram)

मुंबईच्या V Unbeatable डान्स ग्रुपने अमेरिका गॉट टॅलेंट: द चॅम्पियन्स (America's Got Talent: The Champions) च्या दुसऱ्या सीझनच्या विजेतेपदी आपले नाव कोरले आहे. यापूर्वी व्ही अनबिटेबल या ग्रुपने याच स्पर्धेचे पहिले पर्व गाजवले होते मात्र त्यात त्यांना अंतिम फेरीत चौथे स्थान प्राप्त झाले होते. त्यांनत जोरदार तयारी सहित यंदा पुन्हा एकदा त्यांनी स्पर्धेत प्रवेश घेत, संपूर्ण सीझन मध्ये सर्वांचे लक्ष वेधत आणि एकापेक्षा एक भन्नाट परफॉर्मन्सेस देत आता अंतिम विजेता म्ह्णून स्थान मिळवले आहे. या महाअंतिम सोहळ्यात व्ही अनबिटेबल ने अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याच्या रामलीला सिनेमातील गाण्यावर परफॉर्म केले होते, या सादरीकरणानंतर त्यांना सर्व परीक्षकांसह प्रेक्षकांनी सुद्धा स्टँडिंग ओव्हेशन दिली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, व्ही अनबिटेबल च्या या विजयात रणवीर सिंह हा त्यांचा लकी चार्म ठरला असल्याचे या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले आहे. जेव्हा जेव्हा त्यांनी डान्ससाठी रणवीरची गाणे निवडली तेव्हा त्यांचा शो हिट झाल्याचे देखील ग्रुपचे म्हणणे आहे. आणि आता अमेरिका गॉट टॅलेंटच्या अंतिम सोहळ्यात सुद्धा रणवीरच्या गाण्यावर डान्स केल्यानंतर त्यांना विजय प्राप्त झाल्याने त्यांचा हा दावा खरा ठरलाय.अमेरिका गॉट टॅलेंटच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून या वर्षीच्या विजेत्यांचे नाव घोषित करत त्यांच्या सादरीकरांची झलक सुद्धा शेअर करण्यात आली आहे.

V Unbeatable Winning Moment 

पहा V Unbeatable डान्स ग्रुप च्या सादरीकरणाचा व्हिडीओ

V Unbeatable या ग्रुपचे आधीचे नाव हे केवळ अनबिटेबल इतकेच होते मात्र त्यांच्या विकास नामक ग्रुप मेंबरचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर हे नाव बदलून विकासचे नाव जोडत V Unbeatable असे ठेवण्यात आले. या वेळेच्या परफॉर्मन्स नंतर सुद्धा या ग्रुपने विकासच्या नावाची हुडी घातली होती. या ग्रुपमध्ये 12 ते 27 वयोगटातील तब्बल 29  जण आहेत, ज्यांनी आजवर आपल्या अफलातून टॅलेंटमुळे अनेक मान सन्मान आपल्या नावी केले आहेत.