V Unbeatable डान्स ग्रुपच्या America Got Talent स्पर्धेमधील अंतिम सादरीकरणात रणवीर सिंह असणार लकी चार्म
V. Unbeatable enters the finale of America's Got Talent (Photo Credits: Instagram)

मुंबईतील डान्स ग्रुप 'व्ही अनबिटेबल' ( V Unbeatable) यांनी अमेरिका गॉट टॅलेंट (America Got Talent)  या स्पर्धेत आपल्या नावाप्रमाणेच जबरदस्त सादरीकरणे करत अंतिम फेरीमध्ये धडक दिली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार 18 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सोहळा रंगणार असून या मध्ये हा अस्सल मुंबईकर ग्रुप देखील आपल्या अनोख्या शैलीत दिसून येणार आहे. अशावेळी सातासमुद्रापार मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेल्या बॉलीवूडच्या एखाद्या गाण्यावर परफॉर्मन्स याशिवाय उत्तम पर्याय काय असू शकतो? या खास सोहळ्यसाठी अनबिटेबल ग्रुपने त्यांचा दरवेळेला लकी चार्म रणवीर सिंह (Ranveer Singh) याच्या गुंडे (Gunday) सिनेमातील जश्न- ए- इश्का (Jashn- E-Ishqa) या गाण्याची निवड केली आहे. मागील वेळेस या ग्रुपला परीक्षकांनी स्टँडिंग ओव्हेशन दिल्यामुळे केवळ भारतीयच नव्हे तर अमेरिकन प्रेक्षकांचे सुद्धा त्यांच्या सादरीकरणाची उत्सुकता आहे.

V Unbeatable या ग्रुपमध्ये 12 ते 27 या वयोगटातील एकूण 29 जण आहेत. यापूर्वी अनेकदा त्यांनी रणवीरच्या गणत्यांवर परफॉर्मन्स केला आहे.दरम्यान, ह्रितिक रोशनने सुद्धा या संघाला शुभेच्छा देण्यासाठी के खास ट्विट केले आहेमी ज्याप्रकारे ही मंडळी नाचतात ते विचार करण्याच्या पलीकडे आहे.. त्यातही त्यांचा केवळ डान्स नाही तर स्वपन पूर्ण करण्याच्या मेहनतीसाठी त्यांचे कौतुक आहे असे त्याने ट्विट मध्ये लिहिले होते.

ह्रितिक रोशन ट्विट

सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा जेव्हा त्यांनी डान्ससाठी रणवीरची गाणे निवडली तेव्हा त्यांचा शो हिट झाल्याचे देखील ग्रुपचे म्हणणे आहे. त्यामुळे याच लकी चार्मला अंतिम फेरीसाठी वापरला जाईल. तसेच आम्हाला सुरुवातीपासूनच बॉलिवूड गाणीच घ्यायची होती पण त्याचा अर्थ इथे लोकांना कळेल का याची शंका होती, मात्र यावर उपाय म्हणजे रणवीरची गाणी ज्यात भरपूर बिट्स  असल्याने डान्सची मजा आणखीनच वाढते, या सर्व विचारानुसार आम्ही आता तयारी करत आहोत म्ह्णूनच अशी माहिती अनबिटेबल टीमचा लीडर ओम प्रकाश चौहान याने दिली.