danka PC YOUTUBE

Danka Harinamacha Trailer: 'डंका हरिनामाचा' आगामी चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई म्हणजे अवघ्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत. डंका हरिनामाचा या चित्रपटतून पंढरीचे विठ्ठल रखुमाई यांची आस  प्रेक्षकांना याची अनुभूती घेता येणार आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  (हेही वाचा- आदित्य धरच्या आगामी 'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त आणि आर माधवन मुख्य भूमिकेत)

हा चित्रपट येत्या 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रुद एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत करणार आहे. रविंद्र फड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केले आहे. चित्रपटाअसलचा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी त्यांच्या विठ्ठू माऊलीच्या प्रती असलेल्या भक्तीशी संबंधित आहे.

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, हरिपूर या खेड्यागावातील विठ्ठलाची मूर्ती चोरीली गेल्यानतंर गावाचे वैभव हरवते. चोरीची मूर्ती शोधण्यासाठी ही गावकरी शोध मोहित घेत आहे. अशी काहीशी कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी आशा कलाकारांकडून व्यक्त केली जात आहे. चित्रपटात कलाकारांची मांडीयाळी आहे. सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनिल, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, किरण भालेराव, मयुर पवार, कबीर दुहान सिंग, महेश जाधव असं कलाकार चित्रपटात झळकणार आहे.