Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

विक्रम धाकतोडे (Vikram Dhakatode) या 'टर्री' सिनेमाच्या निर्मात्याला अहमदनगर मध्ये सिनेमाच्या सेटवरूनच अटक झाली आहे. धाकतोडे याची पत्नी रूपाली धाकतोडे हीने पनवेल पोलिस स्टेशन (Panvel Police Station) मध्ये तिच्यावर अत्याचार होत असल्याची तसेच फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. रूपालीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत विक्रमच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.

ईटी टाईम्स सोबत बोलताना रूपाली ने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये विक्रम सोबत तिचा विवाह झाला. हे विक्रमचं दुसरं लग्न होतं. त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल रूपालीला माहिती होती. त्याने तिला प्रियंका यादव या मुलीची ओळख त्याची बहीण म्हणून केली होती. नंतर रूपालीला कळलं त्याचे प्रियंकासोबत विवाहबाह्य संबंध होते. या बाबत कुणालाच काही सांगायचं नाही असं तिला धमकावला जात होते.

सिनेमा बनवण्याच्या बहाण्याने विक्रमने रूपालीकडून पैसे देखील घेतले होते. यामध्ये तिची सारी पूंजी संपली होती. विक्रमची मनोरंजन क्षेत्रातील सारी ट्रान्झॅक्शन ही रूपालीच्या अकाऊंट द्वाराच होत असे. विक्रमची पहिली पत्नी प्रतिक्षा हीने देखील हाच त्रास 9 वर्ष भोगला होता असं देखील रूपालीने म्हटलं आहे. रूपाली ने हा सारा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या विरूद्ध तक्रार नोंदवण्याचं ठरवलं. नक्की वाचा: Lawsuit Filed Against Rakhi Sawant: Bigg Boss 14 फेम राखी सावंत व तिचा भावावर लाखो रुपयांच्या फसवणुकीचा आरोप; FIR दाखल- Reports .

पनवेल पोलिसांनी धाकतोडे वर कलम 377, 498 A, 406, 420, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विक्रम धाकतोडे याला यापूर्वी अभिनेता, निर्माता अमोल कागणे याचे 30 लाख बुडवल्याप्रकरणी देखील अटक झाली आहे.