Lawsuit Filed Against Rakhi Sawant: Bigg Boss 14 फेम राखी सावंत व तिचा भावावर लाखो रुपयांच्या फसवणुकीचा आरोप; FIR दाखल- Reports
राखी सावंत (Photo Credits: Yogen Shah)

'बिग बॉस 14' ची स्पर्धक, अभिनेत्री आणि डान्सर राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या तिच्या आईच्या कर्करोगावर उपचार करत आहे. आता एका फसवणूकीच्या प्रकरणात तिचे नाव समोर आले आहे. दिल्लीच्या विकासपुरी येथे फसवणूकीच्या प्रकरणात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीच्या घटनेमुळे राखीच्या संकटामध्ये वाढ होऊ शकते. राखी आणि तिचा भाऊ राकेश सावंत यांच्या विरोधात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राखी सावंत आणि तिच्या भाऊ यांच्याशिवाय राज खत्री नावाच्या व्यक्तीचा उल्लेखही एफआयआरमध्ये आहे.

हे प्रकरण 2017 चे असल्याचे समोर आले आहे. 'मायापुरी' च्या वृत्तानुसार, राखीचा भाऊ राकेश सावंत याने व्यवसायाबद्दल शैलेश श्रीवास्तव नावाच्या सेवानिवृत्त बँक कर्मचार्‍यांशी भेट घेतली होती. ही बैठक राज खत्री नावाच्या व्यक्तीने घडवून आणली होती. राखीचा भाऊ राकेशने शैलेशसोबत चित्रपटाची योजना आखली होती. हा चित्रपट बाबा गुरमीत राम रहीम यांच्या कथेवर आधारित होता. यानंतर राकेशने शैलेश श्रीवास्तव यांना शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यासही सांगितले होते.

पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार विकासपुरी परिसरात नृत्य संस्था सुरू करण्यासाठी दोघांमध्ये करार झाला. राकेश सावंत याने वचन दिले की तो त्याची बहीण राखी सावंत हिला संस्थेत घेऊन येईल. त्यानंतर राकेश सावंत आणि राज खत्री यांनी शैलेश श्रीवास्तव यांच्याकडून राखी सावंतच्या नावे 6 लाख रुपये घेतले. राकेश आणि राज यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी शैलेश यांना 7 लाख रुपयांचे पोस्ट डेटेड चेक्स दिले, मात्र जेव्हा शैलेश हा धनादेश घेऊन बँकेत गेले तेव्हा चेकवर चुकीचे हस्ताक्षर असल्याचे आढळून आले. (हेही वाचा: Kangana Ranaut आणि तिची बहीण Rangoli Chandel यांनी मुंबईतील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यांना हिमाचल प्रदेशच्या न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव)

अहवालानुसार, दोघांमधील करारावरील सहीही योग्य नव्हती. म्हणून, करार देखील अवैध झाला. शैलेश श्रीवास्तव यांनी राकेश सावंतला फोन केला असता त्याने फोन उचलला नाही, त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे एफआयआर दाखल केला. या संदर्भात राखी सावंत किंवा त्याच्या भावाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.