Takatak Movie Song: मराठी चित्रपटातील पहिले बोल्ड गाणे 'ये चंद्राला' प्रदर्शित, अभिनेत्री प्रणाली भालेरावचे जलवे बघून फुटेल घाम
Takatak Movie Song (Photo Credits: YouTube)

सेक्स कॉमेडी आणि डबल मिनिंगने भरलेला 'टकाटक' (TakaTak) या चित्रपटातील एक नवीन हॉट, बोल्ड असे रोमँटिक गाणे 'ये चंद्राला' प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील अभिनेत्री प्रणाली भालेराव हिचा बोल्ड अंदाज पाहून मराठी प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या शिवाय राहणार नाही. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा ट्रेलर जितका हॉट आणि बोल्ड आहे तितकेच हे गाणे देखील बोल्ड आहे. पाहा व्हिडियो

हे गाणे श्रुती राणे (Shruti Rane) हिच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले असून वरुण लिखाते यांनी संगीत दिले आहे. या गाण्यात त्याचबरोबर चित्रपटातही अभिजीत आमकर आणि प्रणाली आमकर यांचे हॉट सीन्स पाहायला मिळतील.

पर्पल बुल एन्टरटेनमेंट प्रस्तुत ह्या चित्रपटात 'दगडू' फेम प्रथमेश परब (Prathmesh Parab) प्रमुख भूमिकेत दिसणार असून प्रथमेश-रितिका श्रोत्री (Ritika Shrotri) ही जोडी प्रथमच एकत्र पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अभिनेता अभिजीत आमकर-प्रणाली भालेराव (Abhijeet Amkar-Pranali Bhalerao) ही जोडी देखील पाहायला मिळणार आहे.

TakaTak Movie Trailer: सेक्स कॉमेडी आणि हॉट सीन्सनी भरलेला 'टकाटक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, उमेश बोलके आदि कलाकारही आहेत. येत्या 28 जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.