TakaTak Movie Trailer: सेक्स कॉमेडी आणि हॉट सीन्सनी भरलेला 'टकाटक' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
TakaTak Movie Trailer (Photo Credits: Facebook)

धमाल कॉमेडी आणि डबल मिनिंगची मिश्रण असलेला मिलिंद कवडे दिग्दर्शित ''टकाटक'(TakaTak)  ह्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाच्या ट्रेलर(Trailer) मध्ये हा चित्रपट खूपच बोल्ड, डबल मिनिंग कॉमेडी आणि हॉट सीन्सनी आणि किसिंग सीन्सनी भरलेला आहे, असं दिसतय. ह्या चित्रपटात 'दगडू' फेम प्रथमेश परब (Prathmesh Parab) प्रमुख भूमिकेत दिसणार असून प्रथमेश-रितिका श्रोत्री(Ritika shrotri) ही जोडी प्रथमच एकत्र पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अभिनेता अभिजीत आमकर-प्रणाली भालेराव(Abhijeet Amkar-Pranali Bhalerao) ही जोडी देखील पाहायला मिळणार आहे.

'टकाटक' चित्रपटाचा ट्रेलर: 

पर्पल बुल एन्टरटेनमेंट प्रस्तुत टकाटक ह्या चित्रपटाची निर्मिती अजय ठाकूर, ओम प्रकाश भट, सुजय शंकरवार, रवी बहरी, इंदरजित सिंग, धनंजय मासूम आणि रबिंद्र चौबे यांनी केली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना मराठीत आजवर कधीही समोर न आलेली सेक्स कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. प्रसंगांनुसार करण्यात आलेली सेक्स कॉमेडी आणि त्यातून झालेली विनोदनिर्मिती हा या चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे. तसेच एकूणच ह्या ट्रेलवरुन एक महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला आहे असं पाहायला मिळतेय.

टाईमपास या चित्रपटाने स्वत:शी अशी वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेला प्रथमेश परब पहिल्यांदाच रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसह एकत्र दिसणार आहे. प्रथमेशने ह्या आधी केतकी माटेगावकर, मिताली मयेकर ह्या अभिनेत्रींसह झळकला होता. आपल्या उत्कृष्ट कॉमेडी टायमिंग आणि दमदार अभिनयाने प्रथमेश ने अवघ्या तरुणाईला वेड लावले. त्याच्या चाहत्यांना या चित्रपटात देखील प्रथमेश एक वेगळ्या रुपात दिसणार आहे.

'दहा बाय दहा' नाटकाद्वारे विजय पाटकर, प्रथमेश परब मराठी रंगभूमीवर देणार विनोदाची फोडणी

तसेच ट्रेलरवरुन आणखी एक नवी कोरी जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांची. चित्रपटाच्या ट्रेलरवरुन ह्या दोघांमध्ये बरीच सेक्स कॉमेडी आणि हॉट सीन्स, किसिंग सीन्स दाखविण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या तरुण पिढीला ह्या चित्रपटातून काय नवा संदेश मिळतो हे पाणे औत्सुक्याचे ठरेल.

या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, उमेश बोलके आदि कलाकारही आहेत. येत्या 28 जूनला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.