राहुल गांधी यांचा चरित्रपट करण्यावर 'सुबोध भावे' ने केला खुलासा
Subodh Bhave ( Photo Credits: Facebook)

राहुल गांधी (Rahul Gandhi) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर पुण्यात आले असताना अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि आर जे मलिष्का यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती. सुबोध भावे हा कलाकार आहे सोबतच तो शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या मंचावर सुबोधला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सुबोध भावेने त्याबाबत खुलासा केला आहे.'I love Narendra Modi' असा टोला लगावत राहुल गांधी यांनी राजकारणातील निवृत्तीचं वयसुद्धा सांगितले

राहुल गांधी चरित्रपट  

सुबोध भावेने राहुल गांधीची मुलाखत घेताना त्यांचावर जीवनपट करायला आवडेल असं म्हटलं होतं. मात्र फेसबूक पोस्टमधून याचा खुलासा करताना त्याने 'कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा विषय काढला.' असं म्हटलं आहे. राहुल गांधींची मुलाखत मी एक कलाकार म्हणून केलेलं काम आहे. 'माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर ही जबाबदारी देणाऱ्या उध्दव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे.' असे सुबोध भावेंनी फेसबूक पोस्टमध्ये लिहले आहे. सुबोध भावेने साकारलेले लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत.

सुबोध भावेची फेसबूक पोस्ट

सुबोध भावे सध्या 'तुला पाहते रे..' मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहे. लवकरच सुबोध अश्रूंची झाली फुले' नाटकांतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. शिवसेना पक्षाच्या चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष असण्यासोबतच तो शिवसैनिक असल्याचंही त्यानं यापूर्वी अनेकवेळेस उघडपणे सांगितलं आहे.