Lok Sabha Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्धल माझ्या मनात प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या मनात मात्र माझ्याबद्धल किंचीतही प्रेम नाही, असा टोला लगावत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुणे शहरानजिक असलेल्या हडपसर येथील मगरपट्टा सिटी येथे तरुणाईशी संवाध साधला. या वेळी राहुल गांधी आय लव्ह यू नरेंद्र मोदी (I love Narendra Modi) असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव उच्चारताच सभागृहात मोदी.. मोदी.. असा अशा घोषणा उपस्थितांतील काही मंडळींनी लगावल्या. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि आरजे मलिष्का (RJ Malishka) यांनी राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीस महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे सुमारे 5 हजार विद्यार्थी उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी या वेळी तरुणाईंच्या प्रश्नांची थेट उत्तरे दिली. आजच्या संवादावेळी राहुल गांधी यांनी अत्यंत दिलखुलास दिसत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. राजकारणात वयाचे बंधन असावे काय? असले तर निवृत्ती साधारण कोणत्या वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेण्यात यावी, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, राजकारणात 60 व्या वर्षी निवृत्त व्हायला हवं असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
राहुल गांधी पुणे येथील मगरपट्टा सीटी येथे बोलताना
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, मला खोटी अश्वासनं देणं किंवा उगाच काहीतरी बोलणं आवडत नाही. मी एखादी गोष्ट ठरवली तर, ती पूर्णच करण्याचा माझा प्रयत्न असतो. मला लोकांसोबत बोलायला आवडते. मी लोकांमध्ये जातो. काँग्रेस जाहीरनाम्यात आम्ही गरीब कुटुंबास प्रतिवर्ष 72 हजार रुपये देण्याबाबत सांगितले आहे. ही कल्पना मला लोकांशी बोलल्यामुळेच सूचल्याचे राहुल गांधी ायंनी या वेळी सांगितले.