डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या बहारदार अभिनयाने नटलेले आणि प्रा. वसंत कानेटकर यांच्या लेखणीतून अवतरलेले 'अश्रुंची झाली फुले' नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे. यातील 'लाल्या' ही घाणेकरांची भूमिका तुफान गाजली. प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलेली ही कलाकृती अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्रपटानंतर सुबोध त्यांच्या सदाबहार 'लाल्या' या भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.
या संदर्भातील माहिती खुद्द सुबोध भावे याने फेसबुक पोस्ट करत दिली आहे. या नाटकाचे फक्त 51 प्रयोग होणार आहेत.
सुबोध भावे याची पोस्ट:
प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित या नाटकात शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप यांच्या भूमिका असतील. तर व्हिडिओत आणि... नंतरची जागा रिकामी दिसत आहे. याचा अर्थ लाल्याच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार, असा संकेत यातून दिला जात आहे. साधारणपणे मे महिन्यापर्यंत हे नाटक रंगमंचावर येईल.