महाराष्ट्राची संत परंपरा तशी फार मोठी आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे रामदास स्वामी. या संत परंपरेची जाणीव तरुण वर्गालाही व्हावी म्हणून लवकरच रामदास स्वामींच्या आयुष्यावर आधारित 'श्री राम समर्थ' हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
घराघरातील संस्कारांचा पाया असलेले 'मनाचे श्लोक' ते दासबोधासारखा अगाध ज्ञान असणारा ग्रंथ, असा रामदास स्वामींनी लिहिलेल्या साहित्याचा अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. वयाच्या 12 व्य वर्षी लग्न मंडपातून ते का पळून गेले व त्यांनी अध्यात्माचा पाया कसा रोवला यावर 'श्री राम समर्थ' या आगामी चित्रपटुन प्रकाश टाकण्यात येईल.
या चित्रपटात अभिनेता शंतनू मोघे रामदास स्वामींची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच महेश कोकाटे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजया सुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि अनेक नवोदित चेहरे सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा हा सिनेमा 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.