अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर; 'वेल डन बेबी' चं शूट होणार लंडनमध्ये
Amruta Khanvilkar and Pushkar Jog (Photo Credits: File Image)

आपल्या हटके अदाकारीने मराठी चित्रपट सृष्टीसोबतच बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा अटकेपार झेंडा रोवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृता लवकरच तिच्या नव्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

'वेल डन बेबी' हे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून ती यात पुष्कर जोग सोबत दिसणार आहे. अमृता आणि पुष्करची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पहिल्यांदाच प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दोघांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली असून 21 ऑक्टोबरपासून या सिनेमाचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरु होणार आहे.

पुष्कर आणि अमृता यांच्यासह अभिनेत्री वंदना गुप्ते यादेखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तसेच प्रियांका तन्वर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

पुष्करने अलीकडेच 'ती अँड ती' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. मात्र अमृताने ब-याच काळानंतर मराठी चित्रपटात पुन्हा एन्ट्री घेतली आहे.