Video: रिंकू राजगुरु हिच्या 'कागर' चित्रपटातील पहिलं गाणं You Tube वर प्रदर्शित
Rinku Rajguru Kaagar Movie (Photo Credits- File Photo)

Kaagar Movie Song Lagliya Godi Tujhi Release: अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित 'कागर' या सिनेमातील पहिले गाणे युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. 'लागलीया गोडी तुझी' असे गाण्याचे बोल आहेत. 'Kaagar' सिनेमाचा Teaser नुकताच लॉन्च झाला होता. वायकॉम १८ मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'कागर'च्या Teaser ला नेटीझन्सनी या चांगला प्रतिसाद दिला होता.

‌'कागर' ही एक प्रेम कथा आहे जी राजकारणाशी गुंफलेली आहे. 'सुधीर कोलते' आणि 'विकास हांडे' यांच्या' उदाहरणार्थ' या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, दिग्दर्शक' मकरंद माने' यांनी कागर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. 'लागलीया गोडी तुझी' हे एक प्रेमगीत असून या गाण्याचे लेखन आणि संगीत दिग्दर्शन ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी केले आहे. तसेच शशा तिरुपती आणि हर्षवर्धन वावरे यांनी या गाण्याचे गायन केले आहे. Kaagar Teaser मुळे प्रेक्षकांची वाढलेली उत्सुकता 'लागलीया गोडी तुझी' या गाण्यामुळे अधिकच वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Kaagar Movie Official Teaser Release; पाहा रिंकू राजगुरु हिचा नवा अंदाज (व्हिडिओ))

कागर सिनेमातील 'लागलीया गोडी तुझी' गाण्याचा व्हिडिओ

दरम्यान, कागर (Kagar Movie) सिनेमाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित झाले होते. 'तळपत्या उन्हात झळाळून निघणार. तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार. जुना जाणार तेव्हाच नवा येणार…'कागर', अशा पंचलाईनमध्ये रिकूच्या कागरचे पोस्टर झळले होते.