Kaagar Movie Official Teaser Release; पाहा रिंकू राजगुरु हिचा नवा अंदाज  (व्हिडिओ)
Kaagar Movie Official Teaser Release | (Photo Credit : Youtube)

Kaagar Movie Official Teaser Release: अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिची प्रमुख भूमिका असलेला Kaagar सिनेमाचा Official Teaser नुकताच लॉन्च झाला. 'सैराट' (Sairat) चित्रपटात रिंकू राजगुरु हिने साकारलेली आर्ची चांगली भाव खाऊन गेली. कागर सिनेमाच्या माध्यमातून रिकू राजगुरु पुन्हा एकदा चाहते आणि प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा येत्या एप्रिलपासून चित्रपटगृहात झळकणार आहे.

दरम्यान, कागर (Kagar Movie) सिनेमाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित झाले होते. 'तळपत्या उन्हात झळाळून निघणार. तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार. जुना जाणार तेव्हाच नवा येणार…'कागर', अशा पंचलाईनमध्ये रिकूच्या कागरचे पोस्टर झळले होते. (हेही वाचा, नव्या 'कागर' चित्रपटामधून रिंकू राजगुरू प्रेक्षकांच्या भेटीला; 'व्‍हॅलेंटाईन डे'ला साजरा होणार प्रेमाचा उत्सव!)

कागर सिनेमाचा Official Teaser

दरम्यान, Teaser  पाहून तर, सिनेमाबाबत उत्सुकता वाटते आहे. प्रत्यक्षात सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे मात्र सिनेमा चित्रपटगृहात आल्यानंतरच कळणार आहे. ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या मकरंद माने यांनी 'कागर' चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे कागरबाबतही जोरदार उत्सुकता आहे