
मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. दोघांनीही इंस्टाग्राम स्टोरीद्वारे (Instagram Story) यासंदर्भातील माहिती दिली आहे. उमेश कामत याने इंस्टा स्टोरीत लिहिले की, "दुर्दैवाने प्रिया आणि माझी कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. आम्ही दोघेही होम क्वारंटाईन आहोत. आम्ही आवश्यक सर्व औषधे आणि काळजी घेत आहोत. कृपया मागील आठवड्याभरात आमच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी किंवा स्वत:ला आयसोलेट करावे." प्रियाने देखील अशाच आशयाचा मेसेज आपल्या इंस्टास्टोरीवर शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी 'आणि काय हवं?' या वेबसिरीजच्या तिसऱ्या सीजनच्या शुटींगला सुरुवात केली होती. याची माहिती देखील त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. त्यानंतर आठवड्याभरातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पहा पोस्ट:
View this post on Instagram
प्रिया-उमेश हे मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय कपल असून त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच लवकर बरे होण्यासाठी कमेंटच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान, प्रिया आणि उमेश देखील सोशल मीडियावर फोटोज, व्हिडिओज शेअर करत चाहत्यांशी कनेक्टेड राहतात.
यापूर्वी कलाविश्वातील अनेक कलाकार कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. अलिकडेच रणबीर कपूर, संजय लीला भन्साली, मनोज वाजपेयी या बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती.