Picasso Trailer: अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ यांच्याकडून आज त्यांचा पहिलाच मराठी डायरेक्ट टू सर्विस ऑफरिंग 'पिकासो' (Picasso) चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता आणि विविध पुरस्कार विजेता प्रसाद ओक, समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम मुख्य भुमिकेतून झळकणार आहेत. पिकासो ची कथा ही अस्वस्थ मद्यपी वडील आणि त्यांच्या मुलाची मोठी स्वप्ने याच्या आधारावर असणार आहे. परंतु यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजेच कलेची ताकद आणि मुलाने उराशी बाळगलेले स्वप्न हे दशावताराच्या वेळी करण्यात येणारा मेकअप ते पिकासोच्या गॅलरीत बसून चित्र काढण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण होणार का हे सांगणारा आहे. त्यामुळे आता आपल्याला हा सिनेमा आवर्जुन पहावा लागणार आहे.
पिकासो सिनेमाचे दिग्दर्शन आणि सह लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग तर सह लेखक हे तुषार परांजपे यांनी केले आहे. भारत आणि 240 देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्यांना येत्या 19 मार्च पासून या सिनेमाचा वर्ल्ड प्रिमिअर अॅमेझॉनवर सर्वांना पहता येणार आहे. (Bali First Look: स्वप्निल जोशी अडकला एलिझाबेथ च्या जाळ्यात, 'बळी' चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर)
Tweet:
we’re beyond delighted to bring to you the story of a boy with big dreams and the story of the healing power of art that that can bring dreams to life 💕
watch #PicassoOnPrime, this March 19@prasadoak17 @ShiladityaBora @PlatoonOneFilms @ShilpiAgar @abhijeetwarang1 pic.twitter.com/0slz69DoMk
— amazon prime video IN (@PrimeVideoIN) March 15, 2021
तर चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलताना पदार्पणीय दिग्दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्हणाले, ''मला बालपणापासूनच दशावतार कलेने आकर्षून घेतले आहे. मला दशावताराला अस्सल व मूळ स्वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट 'पिकासो' सादर करण्याचा आनंद होत आहे. मी प्रत्येक कलाकारासाठी हा चित्रपट सहभावना दर्शवण्याचा निर्धार केला. म्हणूनच आम्ही वास्तविक ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग केले.