Bali First Look (Photo Credits: Instagram)

कोण आहे एलिझाबेथ? ज्याच्या जाळ्यात अडकलाय अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi)..याच उत्तर मिळेल येत्या 16 एप्रिलला. स्वप्नील जोशी याची प्रमुख भूमिका असलेला 'बळी' (Bali) चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या 16 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा पोस्टर पाहून अनेकांचा थरकाप उडाला असेल. तर अनेकांना 'एलिझाबेथ' कोण आहे हा प्रश्न पडला आहे. या पोस्टरमध्ये स्वप्नील जोशीचे डोकं पकडणा-या माणसाचा चेहरा दिसत नाही. तर स्वप्नील जोशीच्या डोक्यातून रक्त येताना दिसत असून तो जिवाच्या आकांठाने आक्रोश करताना दिसत आहे.

स्वप्नील जोशी ने बळी चित्रपटाचा पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्याखाली "एलिझाबेथच्या जाळ्या मधून कोणीही सुटू शकत नाही. पण कोण आहे एलिझाबेथ?" असे कॅप्शन दिले आहे.हेदेखील वाचा- Urmila Matondkar Comeback in Bollywood: तब्बल 12 वर्षानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक

या पोस्टरवरुन तरी हा एक भयपट आणि रहस्यमय चित्रपट असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-१’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

विशाल फुरिया यांनी याआधी लपाछपी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर आता विशाल फुरिया आणखी एक मराठीत भयपट घेऊन येत आहे. लपाछपीसारखा हटके विषय मराठीत आणल्यानंतर प्रेक्षकांची बळी या चित्रपटाकडून अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट भयपट प्रेक्षकांची झोप नक्कीच उडवेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.