Urmila Matondkar Comeback in Bollywood: तब्बल 12 वर्षानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
Urmila Matondkar (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिचे देशभरात असंख्य चाहते आहेत. उर्मिला मातोंडकर रुपेरी पडद्यावरुन एकाएकी गायब झाल्यानंतर आता तब्बल 12 वर्षांनी ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. उर्मिला मातोंडकर दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. उर्मिला बॉलिवूडमधून पुन्हा कमबॅक करणार या बातमीने तिचे चाहतेही भलतेच खूश आहेत. 2019 साली उर्मिलाने राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर अनेकदा तू चित्रपटात कधी दिसणार याबाबत प्रश्न विचारले होते. त्यानंतर तिने याबाबत माहिती देत आपण कमबॅक करणार असल्याचे सांगितले आहे.

'लोकांच्या विश्वासावर हा चित्रपट उभा राहिल' असे उर्मिलाने मुलाखतीत सांगितले आहे. त्यामुळे सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात तिची काय भूमिका असेल याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे.हेदेखील वाचा- RHTDM 2: 'रहना है तेरे दिल में' चित्रपटाचा सिक्वेल येणार, 'ही' अभिनेत्री साकारणार दिया मिर्झाची भूमिका?

उर्मिला मातोंडकरने सांगितले की, त्या लवकरच एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यानिमित्ताने त्या मोठ्या पडद्यावर पुन्हा पर्दापण करणार आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, त्या वेबसिरिजचा देखील भाग होणार आहे. परंतु त्या वेबसीरिजचं शूटिंग कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर गेलं होतं. ही वेबसिरिज एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होती. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झालं नाही. लॉकडाऊनमुळे शूटिंगच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या.

आपण केलेल्या चित्रपटांमुळे आपण प्रेक्षकांच्या मनात एक जागा निर्माण केली आहे. याच विश्वासाच्या जोरावर आपण पुन्हा रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे असे उर्मिलाने मुलाखतीत सांगितले आहे.

रंगीला चित्रपटाने उर्मिलाला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील मिली सर्वांनाच भावली. बालकलाकार म्हणून देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. उर्मिलाने 1980 साली श्रीराम लागू यांच्या 'जाकोल' या मराठी चित्रपटातून केली होती. त्यावेळी उर्मिला मातोंडकर या केवळ 6 वर्षांच्या होत्या.