Naad Kara Song in Dhurala: अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव आणि प्रसाद ओक यांच्या अंतरंगी अंदाजात थिरकायला लावणारे 'धुरळा' चित्रपटातील सतरंगी गाणे  'नाद करा' नक्की पाहा; Watch Video
Dhurala Naad Kara Song (Photo Credits: YouTube)

समीर विध्वंस दिग्दर्शित 'धुरळा' या चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा आहे. राजकीय डावपेचांचा नवा रंग या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), सई ताम्हणकर (Sai Tamhankar), अमेय वाघ (Amey Wagh), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), प्रसाद ओक (Prasad Oak) अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाची आणि या चित्रपटातील गाण्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटातील 'नाद करा' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ, अमेय आणि प्रसाद यांच्या अंतरंगी डान्स स्टाईलची झलक तुम्हाला पाहायला मिळेल. आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे यांनी हे धमाकेदार गाणे गायिले आहे.

उत्कर्ष शिंदे यांनी हे गाणे लिहिले असून त्यांनीच या गाण्याला संगीत दिले आहे. पाहूया हे धमाकेदार गाणे

या चित्रपटात अलका कुबल, अंकुश चौधरी, उमेश कामत, प्रियदर्शन जाधव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहे.'Dhurala' Star Cast Poster Out: सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी यांच्यासह मराठीतील 'या' लोकप्रिय कलाकारांवर रंगांची उधळण करणा-या 'धुरळा' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटाच्या लेखनाची धुरा क्षितिज पटवर्धन यांनी सांभाळली असून झी स्टुडिओज, अनीश जोग, रणजित गुगळे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. पोस्टरवरून हा चित्रपट 3 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणारी सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने या चित्रपटाच्या प्रमोशच्या दृष्टीने साडीतला एक हटके ग्लॅमरस लूक सोशल मिडियावर शेअर केला. हा लूक पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. यात तिचा बोल्ड आणि हॉट लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

आनंदी गोपाळ, डबल सीट आणि टाईम प्लीज यांसारख्या दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक समीर विद्वांस (Sameer Vidwans) यांच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे 'धुरळा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरेल की नाही ते येत्या 3 जानेवारील कळेलच.