Mauli Song Dhuvun Taak : रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) 'माऊली'(Mauli) सिनेमातील दुसरं गाणं 'धुवून टाक' (Dhuvun Taak )आज सोशल मीडियामध्ये प्रदर्शित करण्यात आलं आहे. लय भारी (Lai Bhari) प्रमाणेच माऊली सिनेमामध्येही जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh )आणि होळीचं गाणं हे समीकरण दिसून आलं आहे. लय भारी सिनेमातून रितेशने मराठी सिनेमात पदार्पण केलं होतं. बॉक्सऑफिसवर सुपर हिट ठरलेल्या सिनेमामध्ये 'आज होळीचा सण लय भारी.. ' हे गाणं गाजलं होत. तशाचप्रकारे सिक्वेल स्वरूपात येणाऱ्या माऊलीमध्ये रितेश आणि जिनिलिया धुऊन टाक(Dhuvun Taak ) या होळीच्या (Holi Song) गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. MAULI Trailer : माऊली सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रसिकांच्या भेटीला, Salman Khan ने केला ट्विट
माऊली सिनेमाचं संगीत दिग्दर्शन अजय -अतुल या जोडीने केलं आहे. धुऊन टाक हे गाणं अजय गोगावलेच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. हे गाणं अजय-अतुलने लिहलं आहे. Bosco - Caesar या कोरिओग्राफर जोडीने या गाण्याचं नृत्य दिगदर्शन केलं आहे. आजच्या तरुणाईच्या भाषेतले शब्द वापरून इंग्रजी मराठी मिश्रित या गाण्याचे बोल ओठांवर झटकन रुळणारे आहेत.
कार्तिकी एकादशी दिवशी MAULI First Song: रितेश देशमुखच्या माऊली सिनेमातील 'माझी पंढरीची माय' गाणे रसिकांच्या भेटीला आलं होत. आदित्य सरपोतदार याने माऊली सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 14 डिसेंबरला माऊली सिनेमा रिलीज होणार आहे. रितेश देशमुख सोबत सिनेमात सैयामी खेर ( Saiyami Kher) प्रमुख भूमिकेत आहे तर अभिनेता जितेंद्र जोशी खलनायकाच्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.