अभिनेता स्वप्नील जोशी याचे Instagram अकाउंट हॅकिंग करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ शेअर करत युजर्सला दिला 'हा' सल्ला
Swwapnil Joshi | (Instagram)

सध्या सोशल मीडियाचा युजर्सकडून केला जाणारा वापर ऐवढा वाढला आहे की एक सेकंद सुद्धा फोन बाजूला ठेवणे होत नाही. त्यामध्ये खासकरुन सोशल मीडिया संदर्भातील विविध रिपोर्ट्स ही समोर येत असतात. तर गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरील अकाउंट हॅक करुन डेटा प्राप्त करण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. याच पार्श्वभुमीवर आता मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याचे सोशल मीडियातील इंन्स्टाग्राम (Instagram) अकाउंट हॅकिंग (Hacking)  करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याबद्दल स्वप्नीन याने एक खास व्हिडिओ सुद्धा तयार केला असून तो इंन्स्टाग्रावर शेअर केला आहे. त्याचसोबत व्हिडिओ मध्ये त्याने युजर्सला अकाउंट अलर्ट बद्दल ही एक महत्वाचा संदेश दिला आहे.(Top Marathi Actors: मराठी चित्रपटसृष्टी मधील असे कलाकार ज्यांच्यापुढे सुपरस्टार्स देखील पडतील फिके, See List)

स्वप्नील जोशी याने व्हिडिओत असे म्हटले आहे की, माझे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु माझ्या सोशल मीडिया टीमसह चाहत्यांमुळे माझे अकाउंट हॅक होण्यापासून बचावलो आहे. परंतु है दुर्देवी असून इंन्स्टाग्रामवरील Isntagram Support नावाच्या एका फेक अकाउंटने जे वेरिफाईड असल्याचे दाखवले गेले होते. त्याचसोबत या अकाउंटचे 77 हजार फोलोअर्स ही होते. त्या अकाउंटवरुन असे आले होते की, Copyright Content Violate केला आहे. त्याचसोबत कायद्याची भाषा ही त्यात बोलली गेली होती. मात्र याबद्दल अधिक तपास केला असता त्या अकाउंट बद्दल संशय व्यक्त केला गेला.

हे अकाउंट वेरिफाय करण्याचा ही प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांनी वारंवार इंन्स्टाग्राम अकाउंटचा आयडी आणि पासवर्डसह कोड मागितला जात होता. परंतु सुदैवाने तुम्ही नेहमीच Two Factor Authontication सुरु ठेवावे. असे केल्यामुळेच माझ्या सोशल मीडिया टीमने याबद्दल अधिक तपास करत कोणतीरी हॅकिंग पासून बचावलो. त्यामुळे नेहमीच पासवर्ड, आयडी किंवा कोणताही फॉर्म भरु नका असे आवाहन स्वप्नील केले आहे.(Subodh Bhave Deleted Twitter Account: 'काळजी घ्या, मस्त रहा!' असे म्हणत मराठी अभिनेता सुबोध भावे याने ट्विटर अकाऊंट केले डिलीट)

स्वप्नील याने पुढे असे ही म्हटले आहे की, हॅकिंगचे प्रकार हे अधिक फॉलोअर्स असलेल्या सेलेब्स सोबत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तुम्ही याबद्दल अधिक काळजी घ्या. तसेच कोणाचे DM तुम्ही ओपन करता किंवा कधीच खासगी माहिती इंटरनेटवरील फॉर्मवर शेअर करु नका असे ही स्वप्नील याने म्हटले आहे.