Subodh Bhave Deleted Twitter Account: 'काळजी घ्या, मस्त रहा!' असे म्हणत मराठी अभिनेता सुबोध भावे याने ट्विटर अकाऊंट केले डिलीट
Subodh Bhave | (Instagram)

अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण मानवाच्या या मुलभुत गरजांप्रमाणे आता इंटरनेटचाही वापर वाढला आहे. याशिवाय, सध्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) आपले ट्विटर अकांउट (Twitter Account) डिलीट केले आहे. सुबोधने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चचकीत करून टाकले आहे. ट्विटर अकांउट दिलीट करण्यामागे काही विशेष कारण नसून आपल्याला कंटाळा आल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच इतर दुसऱ्या ठिकाणी वेळ घालवता यावा, यासाठी त्याने ट्विटर सोडल्याचे कळते आहे. याशिवाय, फेसबूक अकाऊंटदेखील डिलीट करण्याचा तो निर्णय घेऊ शकतो, असेही त्याने म्हटले आहे.

सुबोध भावेने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ट्विटर अकाऊंट डिलिट करत असल्याची माहिती दिली आहे. त्याने असे म्हटले आहे की, 'आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझे ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र, जय हिंद'. त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी सुबोध भावे म्हणाला की, "मी ट्विटरवरून बाहेर पडण्याचे विशेष कारण नाही पण कंटाळा आला आहे. इतर कुठेही वेळ घालवता येईल. त्यामुळे मी ट्विटर सोडत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामबाबत इतक्यात नाही सांगू शकत पण फेसबुकबाबत देखील असा निर्णय घेऊ शकतो." असे तो म्हणाला आहे. हे देखील वाचा- Veteran Actress Saroj Sukhtankar Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन

सुबोध भावे याचे ट्विट-

सुबोधचे ट्विटरवर सध्या 94.6 हजार फॉलोअर्स आहेत. सुबोधची ज्याप्रमाणे प्रशंसा केली जाते. त्याप्रमाणे सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगची शिकार देखील व्हावे लागले आहे. त्यामुळेच त्याने ट्विटरला अलविदा केला आहे, अशा अनेक कमेंट्स ट्विटर वापरकर्त्यांनी दिल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, यानंतर सुबोध पुन्हा कधीच ट्विटरवर चालू करणार नाही का? असाही प्रश्नही अनेकांना पडला आहे.