Manasi Naik Engagement: मानसी नाईक होणार 'मिसेस खरेरा'; बॉक्सर, मॉडेल बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा  सोबत साखरपुडा
Manasi Naik| Photo Credits: Instagram

'बाई वाड्यावर या...' गाणं फेम अभिनेत्री मानसी नाईकचा (Mansi Naik) साखरपुडा पार पडला आहे. सोशल मीडियावर मानसीने तिचा पार्टनर प्रदीप खरेरा (Pradeep Kharera)  सोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. दरम्यान मानसी अअणि प्रदीप मागील काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होते आता त्यांनी साखरपुडा केला आहे. प्रदीप हा बॉक्सर आणि मॉडेल आहे. दरम्यान काल (10 नोव्हेंबर) मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये मानसी आणि प्रदीपकचा साखरपुडा पार पडला आहे. लवकरच ते विवाहबंधनात अकडतील. 'बाई वाड्यावर या..' आणि 'बघतोय रिक्षावाला' ही दोन मानसीवर चित्रित गाणी तुफान गाजली आहेत. Sai Lokur Bachelorette Party Photoshoot: सई लोकुर हिचे बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल, पाहा मैत्रिणींसोबत सईने केलेली धमालमस्ती, See Pics.

मानसी नाईक साखरपुडा

दरम्यान मागील कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. यामध्ये आता मानसीचा देखील समावेश आहे. जुलै मध्ये अर्चना निपाणकर त्यानंतर शर्मिष्ठा राऊत, सोनाली कुलकर्णी, सई लोकूर या अभिनेत्रींनी लॉकडाऊनमध्येच लग्न आणि साखरपुडा केला आहे.

प्रदीप हा मुंबईत राहत असला तरी मूळचा हरियाणाचा आहे. पण साखरपुडा साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यासोहळ्याला अभिनेत्री दीपाली सय्यदने देखील उपस्थिती लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार मानसी-प्रदीप जानेवारी 2021 मध्ये ल्ग्न बंधनामध्ये अदकण्याची शक्यता आहे.