Sai Lokur Bachelorette Party Photoshoot: सई लोकुर हिचे बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल, पाहा मैत्रिणींसोबत सईने केलेली धमालमस्ती, See Pics
Sai Lokur Bachelor Party Photoshoot (Photo Credits: Instagram)

बिग बॉस मराठी 1 ची स्पर्धक अभिनेत्री सई लोकुर (Sai Lokur) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 2 ऑक्टोबरला सई आणि तीर्थदिप रॉय (TirthaDeep Roy) यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर सई आणि तीर्थदिपचे बरेच फोटो सई सोशल मिडियावर शेअर करत होती. मात्र नुकताच तिने आपल्या बॅचलर पार्टीचा (Bachelor Party) फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी खास बॅचलर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सईने आपल्या मैत्रिणींसोबत छान आणि तितकेच हटके फोटोशूटही केले आहे. हे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या बॅचलर पार्टीचे फोटोशूट सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले असून यात ती आपल्या मैत्रिणींसोबत धमालमस्ती करताना दिसत आहे.

हेदेखील वाचा- Sai Lokur Engagement Photos: सई लोकूर चा झाला अखेर साखरपुडा, कोण आहे सईचा जोडीदार, पाहा या सोहळ्याचे सुंदर फोटोज

या फोटोशूटमध्ये सईने 'I m Getting Married' या मेसेजचे लाल रंगाचे टी शर्ट घातले आहे. तर तिच्या मैत्रिणींनी 'We are Getting Drunk' अशा संदेशाचे टी-शर्ट घातले आहे.

सई आपल्या लग्नाला घेऊन खूपच एक्सायटेड असून आपल्या रिलेशनशिपपासून आपला होणार नवरा कोण आहे याबाबत सोशल मिडियावर अनेक अपडेट्स ती देत होती. त्यात आता तिचे बॅचलर पार्टीचे फोटो पाहून ती लवकरच बोहल्यावर चढणार असे चित्र दिसत आहे.

सई लोकूर बिग बॉस आधी 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.