एकापेक्षा एक दर्जेदार आणि रसिकांच्या मनाचा भेदणार्या विषयाची सिनेमात मांडणी करणार्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे (Sumitra Bhave) यांचे मागील महिन्यात निधन झाले आहे. दरम्यान सुमित्राभावे दिग्दर्शित शेवटचा सिनेमा 'दिठी' (Dithee) आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे. सध्या कोविड 19 नियमावलीमुळे थिएटर्समध्ये सिनेमा अद्याप प्रदर्शित होऊ शकला नसला तरीही आता हा सिनेमा 21 मे 2021 दिवशी सोनी लिव अॅप वर ऑनलाईन प्रदर्शित केला जाणार आहे. दिठी सिनेमाची कथा एका 30 वर्षीय मुलाला गमावलेल्या बापावर बेतली आहे. किशोर कदम ही प्रमुख करत आहे. काही दिवसंपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून रसिकांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे. नक्की वाचा: Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन.
'दिठी' सिनेमामध्ये किशोर कदम सोबत अभिनेते मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष अशी मुरब्बी कलाकारांची फळी आहे. एका सामान्य लोहार काम करणाऱ्या व्यक्तीवर, जो आपल्या मुलाच्या मृत्यूच्या वेदनेतून एकत्त्वाचा अनुभव घेतो. तरूण मुलाला बापाची कहाणी ही डोळ्यात पाणी अणणारी आहे. ‘दिठी’ हा सिनेमा दि. बा. मोकाशी यांच्या एका कथेवर आधारित आहे.
दिठी चित्रपटाचा ट्रेलर इथे पहा
सुमित्रा भावे या 6 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 11 राष्ट्रीय पुरस्कार आणि 45 पेक्षा जास्त राज्य पुरस्कार विजेत्या आहेत. कथा, पटकथा, गीत लेखन, कला दिग्दर्शन, वेशभूषा आणि दिग्दर्शिका अशा प्रत्येक पैलूंमध्ये त्यांनी आपलं नैपुण्य दाखवलं आहे. महिन्यापूर्वी आजारपणाने त्याचं निधन झालं.