Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन
Sumitra Bhave (Photo Credits-Twitter)

Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी आज अखेर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या दु:खद घटनेमुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सुमित्रा भावे या गेल्या काही दिवसांपासून आजाराशी लढत होत्या. मात्र अखेर आज त्यांची दीपज्योत मालवली गेली आहे.(Pandit Kiran Mishra Dies of COVID19: ज्येष्ठ गीतकार पंडित किरण मिश्र यांचे कोव्हीड-19 मुळे निधन, 15 दिवसांपूर्वी घेतली होती कोरोनाची पहिली लस) 

सुमित्रा भावे यांनी सुनिल सुखटणकर यांच्यासोबत एकत्रित काम करत भारतातील चित्रपट आणि टेलिव्हिजनवर आपला ठसा उमटवला होता. त्याचसोबत भावे आणि सुखटणकर यांनी संयुक्तपणे 14 फिचर फिल्म्स, 50 हून अधिक शॉर्ट फिल्म्स आणि टेलिव्हिजनसह टेलिफिल्म्स सुद्धा दिग्दर्शित केल्या आहेत. हे सर्व त्यांच्या माजी यांनी लिहिले होते. मात्र त्यांच्या चित्रपटांना सहा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, 11 राष्ट्रीय पुरस्कार आणि 45 राज्य पुरस्काराने गौरण्यात आले.(Marathi Movie Puglya: मास्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2021 मध्ये मराठी चित्रपट 'पगल्या' ची बाजी)

तर सुमित्रा भावे यांनी फर्ग्युसन कॉलेज मधून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम.ए चे शिक्षण पूर्ण केले. त्याचसोबत भावे यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदवी सुद्धा मिळविली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले.