Pandit Kiran Mishra Dies of COVID19: ज्येष्ठ गीतकार पंडित किरण मिश्र यांचे कोव्हीड-19 मुळे निधन, 15 दिवसांपूर्वी घेतली होती कोरोनाची पहिली लस
Pandit Kiran Mishra Dies of COVID19 (Photo Credit: Twitter)

Pandit Kiran Mishra Passes Away: कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण भारतात हाहाकार माजवला असताना कलाविश्वाला मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. जेष्ठ गीतकार पंडित किरण मिश्रा यांचे कोरोनामुळे आज सकाळी निधन झाले आहे. याबाबत त्यांचा मुलगा स्वदेश मिश्रा यांनी माहिती दिली आहे. पंडित किरण मिश्रा हे 67 वर्षाचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची 3 दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ज्यामुळे मुंबईच्या (Mumbai) अंधेरी येथील (Andheri) सेव्हन हिल्स रुग्णालयात (Seven Hills Hospital) त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु, उपचारादरम्यान, त्यांची प्रकृती खालावली आणि सकाळी त्यांनी अखरेचा श्वास घेतला आहे.

किरण मिश्र यांना 13 एप्रिल रोजी श्वास घेण्यास अडचणी होत होत्या. तसेच त्यांचा ऑक्सिजन स्तर एकदम खालावला आणि त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला. ज्यामुळे त्यांना अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. विशेष म्हणजे, 15 दिवसांपूर्वी किरण मिश्र यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली होती. किरम मिश्र यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. हे देखील वाचा- Kartik Aaryan आणि Karan Johar मध्ये मोठा वाद; 'Dostana 2' मधून अभिनेत्याला डच्चू- Reports

पंडित किरण मिश्र यांनी शेकडो भक्ती गीतं लिहिली होती. याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी तसेच लोकप्रिय मालिकांसाठी देखील गीतलेखन केले होते. पंडित किरण मिश्र यांनी लिहिलेली 50 हून अधिक भक्ती गीत गायक अनूप जलोटा यांनी गायली आहेत.